प्रतिनिधी / सातारा :
कोडोली दत्तनगर येथे चौघांना किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.
सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अब्दूल मन्सुरी (वय 32) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो दत्तनगर येथील जाधव कॉलनीत त्याचे कामगार अमित पटेल, मोहम्मद साहिल आणि इब्राहिम शेख यांच्यासोबत दि. 2 रोजी सकाळी 9 वाजता गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी अमरजित रावत, गौरव घोरपडे, कपिल निकम, ओमकार निंबाळकर (सर्व रा. लोकमंगल कार्यालयाजवळ, सातारा) हे आले अन् कामगारांना अब्दूलबरोबर काम करायचे नाही. माझ्यासोबत काम करा अन्यथा जीवे मारीन अशी धमकी देत हातातील काठीने मन्सुरीला पाठीत व अमित पटेल यास डोक्यात, मोहम्मद आणि इब्राहिम यांच्या पायावर मारहाण करुन जखमी केले. याचा तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.