प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण परिसर मंगळवारी 5 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी 2.7 रिश्टर स्केल भूकंपाच्या धोक्याने हादरला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेकडे 13.6 किलोमीटर अंतरावरील चांदोली गावाच्या वारणा खोऱयात असल्याची नोंद झाली आहे. या धक्क्याने कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन सूत्रांनी दिली, तर या भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नसल्याची माहिती महसूल विभागाने दिली