प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना परिसर शनिवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरला. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांतील हा सलग तिसरा भूकंप असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना परिसरात शनिवारी रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंद झाली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱयात जावळे गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर नोंद झाला आहे. या भूकंपाची खोली आठ किलोमीटर अंतरावर नोंद झाली आहे.
दरम्यान कोयना धरण परिसरात 1 सप्टेंबर रोजी 2.6 रिश्टर स्केल, 7 सप्टेंबर रोजी 2.8 रिश्टर स्केलचा तर आज पुन्हा 2.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्याने घबराट निर्माण झाली आहे. मात्र या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना व्यवस्थापन सूत्रांकडून देण्यात आला.