सर्व अर्ज बीपीएल कार्डसाठीच : अर्जदारांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण जवळ जवळ पूर्ण : काही रेशनकार्डे ठरविली अवैध
प्रतिनिधी / बेळगाव
बीपीएल कार्ड घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते. चार चाकी वाहन असलेल्यांनीही बीपीएल कार्ड घेतल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. पेन्शनमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार झाला आहे त्या प्रकारे बीपीएल कार्डमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय व राज्य सरकारी नोकरी करणाऱयांनीही बीपीएल कार्ड घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. फौजदारी गुन्हा दाखल होणार म्हणून त्यांनी कार्डे परत केले होती. मात्र अजूनही काही जणांकडे बीपीएल कार्डे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कोरोनाकाळात बीपीएल कार्डसाठी जिह्यातून 45 हजार 533 जणांनी अर्ज केले आहेत.
जिह्यामध्ये आतापर्यंत 68 हजार 609 कुटुंबांकडे अंत्योदय कार्डे आहेत. 10 लाख 73 हजार 493 कुटुंबांकडे बीपीएल कार्डे आहेत. 2 लाख 95 हजार 722 जणांकडे एपीएल कार्डे आहेत. जिह्यात आतापर्यंत 14 लाख 37 हजार 824 कार्डांचे वितरण झाले आहे. सध्या आलेल्या बीपीएल कार्डसाठी अर्जामधील 35 हजार 185 कुटुंबे त्या कार्डासाठी पात्र आहेत. त्यामधील 3 हजार 937 रेशनकार्ड अवैध ठरविण्यात आली आहेत.
आतापर्यंत 39 हजार 122 अर्जदारांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अजून 6 हजार 411 अर्जांचा सर्व्हे करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
कार्ड वितरणावर निर्बंध
सध्या नवीन अर्ज स्वीकारणे आणि वितरणही थांबविण्यात आले आहे. आणखी 15 दिवसांनंतर सर्व्हर सुरू करून कार्ड वितरण व अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू करण्याची शक्मयता अधिकाऱयांनी वर्तविली आहे. कोरोनामुळे काम करणे कठीण जात आहे. कार्डसाठी गर्दी होत असते. त्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व्हरचीही समस्या असल्याचे सांगण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा खात्यातर्फे सदर माहिती देण्यात आली आहे. सध्या सर्वांनाच रेशन देण्यात येत असल्यामुळे कार्ड हवेच असे नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत नसल्याचे सांगण्यात आले.