पालिकेच्या मावळत्या पूर्व संध्येला नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांची माहिती
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या कालावधीत म्हापसा मतदारसंघात चौफेर विकास साधण्यास म्हापसा पालिकेने यश मिळविले असून या पाच वर्षात प्रगती करीत नागरिकांच्या परीक्षेस पात्र ठरलो असल्याची माहिती म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी म्हापसा नगरपालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालिकेचा कार्यकाळ 4 नोव्हेंबर रोजी संपत असून मावळत्या पूर्व संध्येला पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष बोलत हेते. या पाच वर्षाच्या कालावधीत म्हापसा मतदारसंघात पालिकेच्या वतीने सुमारे 90 कोटीची विकासकामे हाती घेतल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिली.
यावेळी म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा समवेत एकूण 15 नगरसेवक उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात या पालिकेत एकत्रितेमुळे एकही नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आला नाही. 2015 साली या नवीन इमारतीत आम्ही आलो, संदीप फळारी यांना नगराध्यक्ष केले. यात भाजी मार्केट नव्याने सुरू केले. लोहिया मैदान नुतनीकरण, शिवाजीचा 45 लाखाचा पुतळा, क्रांती चौक, मास प्रकल्प, मुतारी सोय आदी 197 वाडय़ावाडय़ात घालण्यात आले. बाजाराच्या इतिहासात यंदा बाजारपेठेत पाणी भरले नाही असे नगराध्यक्ष म्हणाले.
गणेशपुरी मैदान, बोडगेश्वर भोवताल परिसर सौंदर्यीकरण, 95 टक्के गुरांचा वाटेवर बसण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. बाजारात पे पार्किंग प्रश्न, शकुंतला जवळ अमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. तसेच आपल्या सहकारी वर्ग, नगरेसवक, पत्रकारांचेही यावेळी आभार मानले.
आमच्यावर काही आरोप झाले मात्र भ्रष्टाचाराबाबत कुणीही आरोप केले नाही. मुख्याधिकारी क्लेन मदेरा, कबीर शिरगांवकर यांच्याकडून सदैव सहकार्य मिळाल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. नगरसेवक संदीप फळारी व रोहन कवळेकर यांनी आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य तसेच नगरसेवकांचे सहकार्य मिळाल्याचे सांगून सर्वांच्या एकजुटीमुळे व एकस्थिरता मिळाल्याने विकासाचा पायंडा ओलांडू शकलो अशी माहिती नगरसेवकांनी दिली.
सर्वांना एकत्रित पुढे नेऊन पुढील पाच वर्षे काढू – आमदार जोशुआ डिसोझा
आपल्या राजकारणात आपल्यास म्हापसा पालिकेवरून नवीन दिशा मिळाली असल्याची माहिती म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. ते म्हणाले आपल्या वडिलांचा धुरा आपण पुढे नेला. ते उपमुख्यमंत्री होते. ते नगरविकास मंत्री होते त्याचा फायदा पालिकेला झाला. त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकल्प, आर्थिक बाब मोठय़ा प्रमाणात मिळाली असल्याची माहिती आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. याकामी स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सहकार्यही मोलाचे लाभले असल्याचे ते म्हणाले. पालिकेत 3 नगराध्यक्ष झाले सर्वांच्या सहकार्याने आपण आमदार झालो. छोटय़ा वयात आमदार होणे कठीण काम केही आपल्यास प्राप्त झाले. रोहन कवळेकर, रायन ब्रागांझा, संदीप फळारी यांनी योग्यरीत्या नगराध्यक्षपद भूषवून सहकार्य केले. आमची टिम यापुढेही अशीच जाऊन पुढील पाच वर्षात विजय मिळवू अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सर्वांच्या सहकार्याबद्दल व म्हापसा वासियांचे आभारही मानले.
सध्या आपले नगरसेवक आहे त्यांना पुढे निवडणुकीत घेऊन जाणार असल्याची माहिती आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. निवडणूक कधी होणार कोणते वॉर्ड राखीव होणार हे आजपर्यंत माहीत नाही. आता प्रशासकाची नियुक्ती होईल. याबाबत अंतिम निर्णय पुढे घेऊ असे आमदार जोशुआ म्हणाले.