ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. गुरुवारी प्रदेशात उच्चांकी रुग्ण वाढ झालेली दिसून आली. प्रदेशात पहिल्यांदाच मागील 24 तासात 6 हजार 251 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 85 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 48 हजारचा टप्पा पार केला आहे. तर आजच्या काल 3,129 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 867 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 20 हजार 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 28,346 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 2,207 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 1163, नैनिताल 673, उधमसिंह नगर 827, टिहरी 163, चमोली 125, पिथोरागडमध्येे 33, पौडीमध्ये 253, बागेश्वर 107 आणि चंपावतमध्ये 157 , अल्मोडा 198, रुद्रप्रयाग 150 आणि उत्तरकाशीमध्ये 195 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 48,318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 2502 ( 1.43 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.82 % इतके आहे.