बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना राज्य सरकारने राज्य १४ दिवस क्लोज डाऊन केलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे बेंगळूर शहरी जिल्ह्यात प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना आणि लॉकडाऊन असूनही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना डीजीपी प्रवीण सूद यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान सूद यांनी “आपण लॉकडाऊन गांभीर्याने घेऊया. हे आमच्या स्वतःच्या हिताचे आहे आणि शक्यतो शेवटच्या उपायांसाठी आहे,” असे ट्विट केले.
दरम्यान कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी नागरिकांनी निर्बंधाचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन केले. “लॉकडाऊन गांभीर्याने घेऊया. हे आपल्याच हिताचे आहे आणि शक्यतो शेवटच्या उपायांसाठी आहे. असे “सूद यांनी ट्वीट केले. ते म्हणाले की, १०,००० हून अधिक वाहने विनाकारण बाहेर पडल्याने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहेत.” मला खात्री आहे की आपल्या वाहनाशिवाय घरी परत जाऊ इच्छित नाही. पोलिसांना सहकार्य करा, घरी रहा आणि साखळी तोडा, “असे सूद यांनी उल्लंघन करणार्यांना इशारा दिला.