ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ 35 दिवसातच कोरोना रुग्णांची 1 लाख पेक्षा अधिक झाली आहे. मागील वर्षी 22 मार्च रोजी कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला होता आणि 16 ऑगस्ट 2020 रोजी संक्रमितांनी एक लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्या दिवशी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 4 हजार 93 इतकी होती.
22 मार्च 2021 पासून आत्तापर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 937 इतकी झाली आहे. यांमध्ये 26 एप्रिलपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 89,660 इतकी आहे.
- 4 ते 6 पटीने वाढत आहे संसर्ग
राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 4 ते 6 पटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 16 ऑगस्ट 2020 रोजी राज्यात 2187 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 25 एप्रिल रोजी एका दिवसात 12,745 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी 15 ऑगस्ट 2020 रोजी 3536 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 26 एप्रिल 2021 रोजी 11 हजार 801 नव्या बाधीतांची नोंद झाली.
दरम्यान, सद्य स्थितीत बाधीतांचा एकूण आकडा 4 लाख 15 हजार 397 इतका आहे. यातील 3 लाख 23 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.