ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन जगभरातील 16 देशात पोहचला आहे. त्यामुळे या देशांची चिंता आणखी वाढली आहे.
आफ्रिकेतून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून हा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये दाखल झाला. त्यानंतर ब्रिटनमधून हा स्ट्रेन 16 देशात पोहचला. ब्रिटनसह स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलंड, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि जर्मनीसह अन्य 8 देशात हा स्ट्रेन पोहचला.
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला होता. तसेच ब्रिटनसह अनेक देशांनी खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवली आहे.