प्रतिनिधी/ पणजी
गत 24 तासात 57 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यातून आतापर्यंत मृत्यू आलेल्यांची संख्या 706 वर पोहोचली आहे. बरे होण्याचे प्रमाण 96.41 टक्क्यांवर पोहोचले असून गत 24 तासात 101 जण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या सध्या 1066 एवढी आहे.
आतापर्यंत एकूण 3,70,690 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 49362 जण कोरोना पोझिटिव्ह सापडले. 47590 जण बरे झाले. संशयित म्हणून 20 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहेत. 07 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
विविध केंद्रांतील कोरोना रुग्णांची संख्या
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : डिचोली 20, सांखळी 29, पेडणे 14, वाळपई 23, म्हापसा 34, पणजी 48, हळदोणा 37, बेतकी 23, कांदोळी 64, कासारवर्णे 11, कोलवाळ 14, खोर्ली 19, चिंबल 23, शिवोली 33, पर्वरी 88, मये 03, कुडचडे 50, काणकोण 36, मडगाव 119, वास्को 49, बाळ्ळी 29, कासावली 35, चिंचिणी 25, कुठ्ठाळी 47, कुडतरी 15, लोटली 30, मडकई 08, केपे 42, सांगे 05, शिरोडा 15, धारबांदोडा 20, फोंडा 35, नावेली 10. त्याशिवाय हवाईमार्गे आलेले 13 बाधित सापडले आहेत.