ऑनलाईन टीम / पुणे :
क्षेत्र त्रिपुटी येथील परब्रम्ह गोपालनाथ महाराजांचा दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा होणारा 10 दिवसांचा पुण्यतिथी महोत्सव कोरोना संकटाच्या पार्श्र्वभुमीवर यावर्षी रद्द करण्यात आला आहे.
परब्रम्ह गोपालनाथ महाराजांचा पुण्यात मोठा वर्ग असून समस्त भक्तवर्गाने याची दखल घ्यावी. दरवर्षी गोकुळ अष्टमी पासून भाद्रपद शुद्ध द्वितीयेअखेर हा महोतस्व साजरा होत असतो. यंदा 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट असा कालावधी होता. पंरतू कोरोनाचे संकट श्रावण उजाडला तरी टळलेले नसून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करुन आणि शासकिय आदेशानुसा यंदाच महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी जन्माष्टमी, पालखी कीर्तनमहोत्सव, गोपालकाला, दहिहंडी, महाप्रसाद आदी कार्यक्रम होत असतात यावर्षी ते कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. भाविक भक्तांनी आपल्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार करुन क्षेत्र त्रिपुटीस येऊ नये मंदीर पूर्णपणे बंद ठवण्यात आल्याचे असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती प.पू.गुरुनाथ महाराज घोलप यांनी कळवली आहे. गुरुनाथ महाराज यांनी सांगितले.