कोरोना संक्रमणाच्या 8-10 लक्षणांसंबंधी आतापर्यंत चर्चा व्हायची, परंतु ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ क्लीनिकल एक्सिलेंस म्हणजेच एनआयसीईने 28 लक्षणांची ओळख पटवून ती जाहीर केली आहेत. एनआयसीईने यासंबंधी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत.
कोरोनाचे प्रभाव आणि लक्षणासंबंधी अद्याप नवनवी माहिती समोर येत आहे. हा विषाणू लोकांवर विविध प्रकारे प्रभाव पाडत आहेत. कुणाला ताप येतोय, तर कुणाला श्वास घेण्यास त्रास होण्यासह अन्य समस्या होत आहेत. एनआयसीईने या पार्श्वभूमीवर कोविड-19 च्या 28 लक्षणांची यादी जाहीर केली आहे.
कोरोना संक्रमणातून बरे झालेले लोकही विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहे. संक्रमणातून मुक्ती मिळाल्यावर दीर्घकाळापर्यंत सुस्ती कायम राहते, असे बहुतांश लोकांचे सांगणे आहे. कोविड-19 दीर्घकाळ टिकत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. प्रारंभिक सौम्य लक्षणे दिसल्यावर आजार गंभीर होऊ शकतो. परंतु कोरोनातून बरे झाल्यावरची लक्षणे चिंताजनक आहेत.
12 आठवडय़ांपर्यंत लक्षणे
कोरोना संक्रमणाची लक्षणे 5 पैकी एका व्यक्तीत 5 आठवडे किंवा त्याहून अधिक काळापर्यंत राहू शकतात. परंतु 10 पैकी एका व्यक्तीत कोविड-19 ची लक्षणे 12 आठवडय़ापर्यंत राहू शकतात असे ब्रिटनच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने म्हटले आहे.
28 लक्षणे
कोरडा खोकला, धाप लागणे, हृदयसंबंधी, छातीत वेदना, भीती वाटणे, छाती जड होणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, झोप न लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनयल, डायरिया, भूक न लागणे, पोटदुखी, मस्कुलोस्केलेटल, सांधेदुखी, स्नायुदुखी, नैराश्य, एंजाइटी, ईएनटीसंबंधी, वास न येणे, गळय़ात खवखव, कानात वेदना, त्वचेवर लाल पुरळ येणे, थकवा, वेदना आणि ताप येणे अशी लक्षणे नमूद करण्यात आली आहेत.