पडेल सोसायटीमार्फत मोफत धान्याचेही वितरण
प्रतिनिधी / विजयदुर्ग:
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठीही शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पडेल ग्रामपंचायतीच्यावतीनेही कोरोनाविषयक योग्य खबरदारी घेण्यात आले असून विविध उपक्रम ग्रा. पं. मार्फत राबविले जात आहेत. संपूर्ण गावामध्ये ग्रा. पं. च्यावतीने कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली असून वाडीवस्त्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच विकास दीक्षित यांनी दिली. दरमन, पडेल सोसायटीच्यावतीने गरीबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त शहरांबरोबरच ग्रामीण भागातही संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विविध उपाययोजनाही ग्रामीण भागात राबविल्या जात आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना शासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत. या बाबतची जनजागृती व कोरोनाविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन पडेल गावातील प्रत्येक वाडीवस्तीमध्ये सरपंच दीक्षित यांनी केले. तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर शासकीय यंत्रणेमार्फत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सुभाष घाडी, राजेश घाडी उपस्थित होते.
प्रत्येक वाडीमध्ये निर्जंतुकीकरण
दरम्यान, पडेल गावातील प्रत्येक वाडीमध्ये जंतुनाशकाची फवारणी पडेल ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली. पडेल शिवडीपासून ही फवारणी सुरू करण्यात आली. यावेळी उपसरपंच घाडी, सदस्य दशरथ टुकरुल, शैलेश टुकरुल, अविनाश फाळके, ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
गरीबांना मोफत धान्याचे वाटप
गरीबांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱया धान्याचे वाटप नुकतेच पडेल सोसायटीमध्ये करण्यात आले. प्रत्येक वाडीतील लाभार्थ्यांसाठी आठवडय़ातील एक वार ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार लाभार्थ्यांना हे धान्य देण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष व सरपंच दीक्षित, उपाध्यक्ष संतोष माश्ये, संचालक श्रीपाद मराठे, बी. एन. पाटणकर, सौ. सुषमा गोठणकर आदी उपस्थित होते.