1 हजार 629 एकूण शाळा
59 हजार 392 पोषण आहार लाभार्थी
1138 धान्य वितरित झालेल्या शाळा
पोषण आहार : 29 हजार 648 विद्यार्थ्यांना धान्य वितरण
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील शाळांना सुट्टी दिली गेल्याने पोषण आहाराचे शिल्लक धान्य विद्यार्थ्यांना वाटून देण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हय़ात पोषण आहाराचा लाभ दिल्या जाणाऱया शासकीय व खासगी मिळून एकूण 1 हजार 629 शाळा आहेत. त्यापैकी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार 1138 शाळांमधील 29 हजार 648 विद्यार्थ्यांना धान्यादी मालाचे वितरण करण्यात आले आहे. तर मोठय़ा पटसंख्येच्या 491 शाळांमधील वितरण अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे 29 हजार 744 विद्यार्थी पोषण आहार धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आणि शाळांना सुट्टीही देण्यात आली. सुट्टीमुळे परीक्षा रद्द केल्या. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया पोषण आहाराच्या धान्यादी मालाचा प्रश्न निर्माण झाला होता. ते धान्य खूप दिवस तसेच राहिल्यास खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते 8 ते 11 एप्रिल या कालावधीत एप्रिलपर्यंतचा साठा विद्यार्थ्यांना वाटून देण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हय़ातील शिक्षकांनी शाळेत जात हे वितरण केले.
जिल्हय़ातील 1629 शाळांपैकी 1138 शाळांमध्ये तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल आणि मसाल्याचे पदार्थ, मीठ इत्यादी मालाचे वितरण करण्यात आले. जिल्हय़ात एकूण 59 हजार 392 विद्यार्थी पोषण आहाराचे लाभार्थी आहेत. यातील 29 हजार 648 विद्यार्थ्यांना धान्य वितरण झाले आहे.
देवगड : 4237 विद्यार्थ्यांना वितरण
देवगड तालुक्मयात 246 शाळांमधून 9 हजार 356 विद्यार्थी याचा लाभ घेतात. त्यापैकी 157 शाळांमधील 4 हजार 237 विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले. वैभववाडी तालुक्मयात 119 शाळांमध्ये 3 हजार 249 विद्यार्थी लाभार्थी असून यातील 90 शाळांतील 2 हजार 44 विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. कुडाळ तालुक्मयातील 273 शाळांमधील 10 हजार 380 विद्यार्थ्यांपैकी 164 शाळातील 3 हजार 986 विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले. कणकवली तालुक्मयात 248 शाळांमधील 11 हजार 554 विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेतात. यातील 83 शाळांतील केवळ 2 हजार 944 विद्यार्थ्यांना धान्य वितरित करण्यात आले. वेंगुर्ले तालुक्मयातील 151 शाळांमधून 6 हजार 607 विद्यार्थी योजनेस पात्र आहेत. यातील 113 शाळांतील 2 हजार 863 विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले.
मालवण : 4081 विद्यार्थ्यांना लाभ
मालवण तालुक्मयातील 235 शाळांमध्ये 5 हजार 264 विद्यार्थी लाभार्थी आहेत. त्यातील 202 शाळांतील 4 हजार 81 विद्यार्थ्यांना, सावंतवाडी तालुक्मयात 246 शाळा असून 10 हजार 405 विद्यार्थी लाभार्थी आहेत. यातील 226 शाळातील 7 हजार 112 विद्यार्थ्यांना, दोडामार्ग तालुक्मयात 111 शाळा असून 2 हजार 577 विद्यार्थी लाभार्थी आहेत. त्यामधील 103 शाळांतील 2 हजार 381 विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले आहे.
ज्या शाळांचे धान्य वितरण अद्याप झालेले नाही, त्या शाळांची पटसंख्या जास्त आहे. त्यामुळे शाळा कमी शिल्लक राहिलेल्या असताना विद्यार्थी संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.