ऑनलाईन टीम / टोकियो :
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला आहे. जपानने मात्र कोरोना रोखण्यासाठी भारतीय काढ्याला पसंती दर्शवली आहे.
जपानने कोरोनावर मात करण्यासाठी नैसर्गिक उपाचार पद्धतीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जपानमधील इजुमियोत्स या शहराचे महापौरकेनिची मिनामिडे यांनी कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुण्यातील डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या संशोधनाचा आधार घेण्यात आला आहे.
वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी संशोधनाद्वारे तयार केलेल्या आयुर्वेदिक काढ्याचा कोरोना उपचारात चांगला उपयोग होत आहे. कोरोना आणि कोरोनोत्तर काळात या काढ्याचा आम्ही वापर करणार आहोत, असे मिनामिडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुळस, अश्वगंधा, सुंठ, दालचिनी, लवंग, गुळवे, ज्येष्ठमध या औषधी वनस्पतींचा या काढ्यासाठी वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.