ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोनाच्या उगमस्रोताची आणि संसर्गाची माहिती घेण्यासाठी चीनच्या वुहानमध्ये गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाचा अहवाल एका वृत्तसंस्थेच्या हाती लागला आहे. त्यानुसार, कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून परल्याची शक्यता फार कमी आहे. हा विषाणू वटवाघुळांमधून प्राण्यांमध्ये आला असावा आणि प्राण्यांमधून माणसाला त्याचा संसर्ग झाला असावा, असे या अहवालात म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे हे तपास पथक 3 फेबुवारीला वुहानमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने कोरोनाचा उगम, त्याचा प्रसार आणि नवीन प्रकारांबाबत अभ्यास केला. येत्या 15 मार्चला त्याचा अहवाल सादर होणार होता. मात्र, त्याला विलंब झाला. या अहवालातील निष्कर्ष चीनला अनुकूल करण्यासाठी आणि उगमस्रोतासंदर्भात क्लीनचिट देण्यासाठीच WHOच्या पथकाकडून हा विलंब होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.