जूनमध्ये 90917 कोटी रुपयांचे संकलन : मागील वर्षाच्या तुलनेत 91 टक्के संकलन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील मार्च महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून देशभरात कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाऊनची घोषणा केली होती. याच काळात विविध उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. या कारणामुळे वस्तू व सेवा कराच्या संकलनात मोठी घसरण नेंदवण्यात आली होती. जूनमध्ये केंद्राने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने व्यवहारांमध्ये तेजी आली असून याचा परिणाम जूनच्या जीएसटी संकलनावर सकारात्मक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील महिन्यात जीएसटी संकलन 90917 कोटी रुपये रुपाने सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. परंतु मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 91 टक्के संकलन झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत ही वाढ समाधानकारक राहिली आहे. अनुक्रमे एप्रिलमध्ये 32294 कोटी आणि मेमध्ये 62009 कोटी रुपये संकलन होते. वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये जीएसटी संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 59 टक्क्मयांवर राहिले आहे. सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत जूनमध्ये जीएसटी संकलन 90917 कोटींवर राहिले असून यात केंद्रीय जीएसटी 18980 कोटी रुपये, राज्य जीएसटी 23970 कोटी रुपये आणि एकीकृत जीएसटी 40302 कोटींवर राहिले आहे