नवी दिल्ली
कोरोना कालावधीत आणि पावसाच्या वातावरणात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु या कालावधीत मसाले आणि भारतीय परंपरागत खाद्य पदार्थांची मागणी आणि विक्री अधिक वेगाने वाढत गेल्याचे पहावयास मिळाले आहे.
बाजारामधील सर्वेक्षण करणारी कंपनी नीलसनने सध्या सादर केलेल्या एका अहवालानुसार वर्तमान काळातील महामारी आणि निवारण उपायामुळे सुरक्षा, आरोग्य आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याची नोंद केली आहे. तसेच हळदीचा वापर हा प्राचीन काळापासून दैनंदिन तत्वावर केला जात आहे. सध्या कोविडमुळे हळदीचा काढा मोठय़ा प्रमाणात वापरला जात आहे.
तर सोबत आले, लसूण, तुळशी, पुदिना आदींचा वापर वाढला असल्याने मसाल्याची बाजारपेठेत मागणी वाढत गेल्याचा अंदाज नोंदवला आहे.
हळदीची मागणी : ई कॉमर्स
मागील काही महिन्यांपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हळदीची मागणी 40 टक्क्मयांनी वाढली आहे. नीलसनच्या निरीक्षणानुसार वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य जपण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट केले आहे.