वार्ताहर/ निपाणी
कोरोनाच्या हाहाकाराने संपूर्ण जग लॉकडाऊन होताना धडधड वाढली आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या सर्व महामारीतून प्रत्येकाने जागृत झाले पाहिजे. प्रशासन यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असले तरी याला जनसामान्यांतून आवश्यक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यातून चिंता वाढली असतानाच निपाणीत बांधकाम मजूर मात्र जागृतीसाठी धडपडत असून समाजात आदर्श बनला आहे.
शासनाने कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी होणारे आर्थिक नुकसान न पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगारांवर कुऱहाड आली असली तरी जाणकार मात्र लॉकडाऊनचे समर्थन करत आहेत. रोजंदारीवर उपजिविका असणारे तर आम्ही पुढे जगलो तरच उपजिविकेचा पुढे विचार होतो,. असे म्हणत लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. असे असताना काही अतिउत्साही मात्र याला सुटीची उपमा देत आनंद लुटण्याचा अनाठायी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातून काही ठिकाणी जेवणावळीचे तर काही ठिकाणी रिकाम्या रस्त्यावर फेरफटका मारण्याचे नियोजन करत आहेत.
निपाणीतील बांधकाम मजूर असणाऱया जयवंत रावण या युवकाने मात्र याला छेद देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. बांधकाम ठप्प झाल्याने जयवंत याने जागृतीसाठी संपूर्ण शहरात सायकल घेऊन पायी फेरफटका मारताना जागृती चालविली आहे. काही ठिकाणी या उपक्रमाचे स्वागत होत आहे. पण काहीजण मात्र याला हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण बांधकाम मजूर असणाऱया जयवंतचा प्रयत्न सर्वांच्याच डोळय़ात अंजन घालण्यास पूरक ठरत आहे.
जयवंतने दुसरे-तिसरे काहीही केले नसून सायकलवर लहान एक व मोठी एक बाहुली ठेवली आहे. याबरोबरच समोर एक फलक लावला असून या फलकांवर सॅनिटायझरची एक बॉटल अडकली आहे. तर कोरोना को हराना है! हमे बचाना है! जय हिंद, असा मजकूर लिहिला आहे.
हे पाहून सर्वजण अवाप् होताना दिसतात. दोन बाहुल्या म्हणजे आपली दोन मुले. यांना वाचविणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. ही पाल्ये वाचली तरच उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनाला हरवायचं आहे व स्वतःला वाचवायचं आहे. तरच आपण उद्या देशाभिमान व्यक्त करण्यासाठी लायक ठरणार असून जय हिंद म्हणता येणार आहे. बांधकाम मजुराची ही थोडक्या कृतीतून केलेली जागृती तरी समजून घेतली पाहिजे, असेच यातून स्पष्ट होते.