प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे शुक्रवारी नावगे येथील लिओमेल सोसायटीच्या करुणालय अनाथालयाला साहित्याची मदत करण्यात आली. इन्फंट्रीचे ब्रिगेडीअर चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तू अनाथालयाला पाठविण्यात आल्या. एकूण 65 अनाथांना पुरेल इतके साहित्य पाठविण्यात आले आहे.
आटा, साखर, डाळ, चहा पावडर, कॉफी, बोर्नव्हिटा यासारखे साहित्य देण्यात आले. संचालिका अनिता रॉड्रिक्स व रुक्मिणी यांच्याकडे हे साहित्य देण्यात आले. यावेळी लिओमेल सोसायटीचे अध्यक्ष व्हिक्टर डिक्रूझ, सुभेदार अशोक जाधव यासह इतर सदस्य उपस्थित होते. अनाथालयाच्यावतीने इन्फंट्रीच्या जवानांचे कौतुक करण्यात आले.