ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 130 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 37 हजार 445 वर पोहचली आहे. यामधील 1,053 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 153 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 496 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,896 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 17 लाख 85 हजार 228 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 38,956 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,485 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.