बुधवारी 479 कोरोनामुक्त, 356 बाधित, 5 बळी
प्रतिनिधी
पणजी
राज्यात बुधवारी कोरोनामुळे पाच जणांचे बळी गेले. त्यात एका वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. गोमेकॉत चार जणांचा मृत्यू झाला तर एका रूग्णचा मृत्यू खासगी हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे मृतांचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा एकूण बळींचा आकडा 519 झाला आहे. कोरोनातुन बरे होणाऱयांचा आकडा वाढत असून नव्याने बाधित सापडण्याचे प्रमाणही कमी होत आहे. बुधवारी 356 नवे कोरोनाबाधित सापडले तर 479 जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय रूग्णांचे प्रमाणही कमी होत असून सक्रिय रूग्णांची संख्या 4188 पर्यंत खाली आली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 39438 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यापैकी 34731 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गोव्यात आलेल्या तीन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी संशयित रूग्ण म्हणून 85 जणांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून 268 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढिलप्रमाणे : डिचोली 114, सांखळी 215, पेडणे 102, वाळपई 117, म्हापसा 230, पणजी 215, हळदोणे 102, बेतकी 93, कांदोळी 200, कासारवर्णे 36, कोलवाळ 83, खोर्ली 98, चिंबल 266, शिवोली 124, पर्वरी 304, मये 28, कुडचडे 111, काणकोण 108, मडगाव 287, वास्को 232, बाळ्ळी 67, कासावली 61, चिंचिणी 31, कुठ्ठाळी 182, कुडतरी 66, लोटली 60, मडकई 66, केपे 99, सांगे 46, शिरोडा 49, धारबांदोडा 53, फोंडा 265, नावेली 75.
14 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण रूग्ण 39438
14 ऑक्टोबरपर्यंतचे बरे झाले झालेले रूग्ण 34731
14 ऑक्टोबरपर्यंतचे सक्रिय रूग्ण 4188
14 ऑक्टोबरचे नवीन रूग्ण 356
14 ऑक्टोबर रोजी बरे झालेले रूग्ण 479
14 ऑक्टोबर रोजीचे बळी 5
आतापर्यंतचे एकूण बळी 519