4.85 कोटी लोकांचे स्क्रीनिंग केले पूर्ण
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यात आतापर्यंत 4.85 कोटी लोकांची कोरोना संसर्गाच्या संदर्भात स्क्रीनिंग करण्यात आले असून हे प्रमाण विक्रमी आहे.
वैद्यकीय परीक्षणासाठी 78 लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये आरोग्य विभागाची पथके पोहोचली आहेत. या घरांमधील लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. आज्यात 4.85 कोटी लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.
1 लाख पथके
लोकांच्या स्क्रीनिंगसाठी आरोग्य विभागाची 1 लाखांहून अधिक पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
2000 व्हेंटिलेटरयुक्त बेड
राज्यात कोविड रुग्णालयांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक बेड उपलब्ध आहेत. यातील 2000 बेड्सना व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. घरी परतणाऱया सर्व श्रमजीवींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. घरी जाण्यापूर्वी प्रत्येकाला धान्य पुरविण्यात आले आहे. श्रमजीवींच्या कौशल्याची माहिती नोंदवून घेत आता त्यांना रोजगार उपलब्ध केला जात असल्याचे योगींनी म्हटले आहे.