बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान या महिन्याच्या सुरूवातीपासूनच कर्नाटकात नवीन कोविड -१९ प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर बेंगळूरमध्ये आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर बैठक घेत आहेत.
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार “वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांची आपत्कालीन बैठकहोत आहे.” वाढती कोरोना संख्या या विषयी रणनीती आणि उपाययोजना यावर चर्चा होत आहे.
१ मार्चपासून कर्नाटकात १२,३६३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या महिन्यापासून सक्रिय संख्या जवळपास दुप्पट झाली आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत ५८०४ सक्रिय प्रकरणे आढळून आली होती, मात्र १७ मार्चला ही संख्या १०,२२० झाली आहे.