बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान पंतप्रधानांनी को-विन पोर्टलवर सूचीबद्ध लसीकरण केंद्रे अद्याप कार्यरत का नाहीत, अशी विचारणा त्यांनी बुधवारी राज्य सरकारला केली. कर्नाटकातील लसीकरणाचा वेग बुधवारी समोर आला.
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी बेंगळूर, बिदर आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये घेतलेल्या उपायांवर चर्चा केली आणि जिथे प्रकरणे सातत्याने वाढत आहेत त्यामुळे त्यांनी येडियुरप्पा सरकारला पुढील संक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात वाढ होते तेथे लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
कर्नाटकातील २,०४२ रुग्णालयांनी को-विन पोर्टवर कोविड लसीकरण केंद्र म्हणून नोंदणी केली आहे ,परंतु १४३९ केंद्रे अद्याप लसीकरण सुरु करू शकले नाहीत.
बैठकीनंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिवसभरात १ लाखांपर्यंत चाचणी घेण्यात येईल आणि दिवसभरात ३ लाखांपर्यंत लसीकरण केले जाईल यासाठी ३,५०० लसीकरण केंद्रे सुरू केली जातील, असे म्हंटले आहे.
शहरे, खेड्यांमध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. या बैठकीनंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी, “या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी पंतप्रधानांनी सर्व १,४३९ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याची सूचना केली आहे.”
आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी, सरकारने नमूद केलेली संख्या चुकीची आहे. “आमच्याकडे जवळपास २,९०० सरकारी सुविधा केंद्रे असून केवळ ६०० खासगी आरोग्य सेवा नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे ४५० खाजगी सुविधांवर लसीकरण सुरू आहे.