प्रतिनिधी/ म्हापसा
कोलवाळ कारागृहात तुरुग प्रशासनाने छापा टाकून झाडाझडती घेतली. यावेळी अंडरट्राईल विभागातून आठ मोबाईल फोन व इतर साहित्य हस्तगत केले. तसेच या कारवाईनंतर कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांची तडकाफडकी बदली तुऊंग प्रशासनाच्या मुख्यालयात करण्यात आली आहे.
हा छापा शुक्रवारी दि. 10 रोजी दु. 2.30 वाजण्याच्या सुमारास टाकला. तुऊंग महानिरीक्षक ओमविर सिंग बिŽाsई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहाचे अधीक्षक गौरीश कुट्टीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई कारागृह कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी कारागृहातील अंडरट्राईल विभार्गींची झडती घेण्यात आली. या विभागात 8 मोबाईल फोन, हेडफोन, ब्लूटूथ, तंबाखू, गुटखा व सिगारेट हे पदार्थ सापडले. ते जप्त करण्यात आले व नंतर तंबाखूजन्य पदार्थ जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
सहाय्यक अधीक्षकांची तडकाफडकी बदली
गेल्या 5 मार्चला तुऊंग महानिरीक्षकांनी कारागृहात छापा टाकला होता. त्यावेळी आठ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले होते. या कारवाईनंतर बुधवारी 8 रोजी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांची पणजी येथे तुऊंग मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. तर कारागृहाची जबाबदारी अधीक्षक कुट्टिकर यांच्याकडे सोपवली आहे. त्यानंतर शुक्रवारी कारागृहातील अंडरट्रायल विभागात हा छापा टाकण्यात आला.