दिवसभरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही, जिल्हा शल्यचिकित्सक बी.सी.केम्पीपाटील यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
मंगळवारी कोल्हापूरकरांसाठी मंगलवार ठरला. जिल्हयात दिवसभरात पावणे दोन हजारपेक्षा अधिक म्हणजे 1 हजार 696 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे कोल्हापुरकरांसाठी दिलासादायक वृत्त ठरले असून एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केंम्पीपाटील यांनी दिली.
जिल्हयातील 254 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत
मंगळवारी दिवसभरात जिल्हा आरोग्य विभागाला 1 हजार 762 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले यापैकी सुमारे 1 हजार 696 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. तर एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच दिवसभरात 733 देशांतर्गत रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून 254 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
तालुका, नपा व मनपा क्षेत्रनिहाय रुग्ण संख्या
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1, सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिह्यात संख्या आहे.
21 ते 50 वर्षांतील व्यक्ती सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हयात एकुण आजअखेर एकुण 378 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यापैकी 259 सर्वाधिक कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्ण हे 21 ते 50 वर्षातील व्यक्ती आहेत. तसेच आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या, वय वर्षे व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे, आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 376 इतकी असून यामध्ये 1 वर्ष – 0, 1 ते 10 वर्ष – 32, 11 ते 20 वर्ष – 49, 21 ते 50 वर्ष – 259, 51 ते 70 वर्ष – 37 तर 71 वर्षावरील 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.
मंगळवारी सकाळी 788 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व 788 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने कोल्हापुरकरांसाठी दिलासादायक वृत्त ठरले. या निगेटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सिंधुदुर्गच्या 20 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आजअखेर जिह्यातील पॉझीटिव्ह रुग्ण संख्या एकूण 378 वर स्थिर रा†िहली. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.