कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरूच आहे. आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यात 118 रुग्ण नव्याने आढळले. तर कोरोनाने आज तिघांचा बळी घेतला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ सुरू आहे.
कोल्हापुरात आज सायंकाळपर्यंत तिघांचा बळी गेल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या 184 वर गेली आहे. आजच्या मृतांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे कोरोनाने निधन झाले. संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक असणारे गायकवाड हे ते कोल्हापुरातील उत्कृष्ट फुटबॉलपटू होते.