प्रदूषण रोखण्यासाठी अनोख्या उपक्रमाची सुरुवात
सुधाकर काशीद / कोल्हापूर
पाईप मधून थंडगार पाण्याची धार शॉवर सारखी पडते आहे त्याखाली चक्क एक म्हैस उभी आहे. कान हलवत, अंग झटकत ही म्हैस अंगावर पडणाया पाण्याच्या धारेचा आनंद घेत आहे. म्हशीचा मालक हातातल्या पोच्याने म्हशीचे अंग घासून स्वच्छ करत आहे. म्हशीचा काळा रंगही किती ताजातवाना असतो हे म्हशीच्या त्या ओल्या अंगाकडे पहिल्या नंतर लगेच जाणवत आहे .म्हस पाण्यात गेली की ती बाहेर लगेच येत नाही असे म्हणतात. येथेही पाण्याच्या थंडगार धारेखाली उभी असलेली म्हस त्या खालून हलायचे नाव घेत नाही. मालकाने दावे धरून बाजूला ओढल्याशिवाय तिचा शॉवर बाथ थांबत नाही.
म्हशीचे असे हे लाड कोल्हापुरात सुरू झाले आहे. दूध कट्यावरचे धारोष्ण दूध आणि अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या कोल्हापुरातल्या म्हशींसाठी अशी मोफत सुविधा मंगळवार पेठेतील बागेत सुरू झाली आहे. पंचगंगा नदी रंकाळा कोटितीर्थ कळंबा तलाव म्हशी धुतल्या तर तो पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा आहे. कोल्हापुरातील गाई-म्हशी नदी तलावातील पाण्यात नेऊ नये हे बरोबरच आहे. मग त्यांना धुवायचे कोठे हा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर प्रत्यक्ष कृतीतून म्हशीच्या या शॉवर बाथने दिले आहे. महापालिका व डीपीडीसीच्या माध्यमातून हा शॉवर बाथ उभा राहिला आहे.
कोल्हापुरात गवळी गल्ली, बुधवार पेठ ,मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बागल चौक, उत्तरेश्वर रंकाळा वेश ,दुधाळी या ठिकाणी पारंपरिक दुग्ध व्यावसायिक आहेत. सर्वांच्या मिळून साधारण पाच ते सात हजार म्हशी आहेत. म्हशींना रोज पाणवठÎावर ने स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. यापूर्वी नदीत तलावात म्हशींना सोडून दिले की काम होत असे. आता प्रदूषणामुळे त्यावर निर्बंध आणले गेले आहेत. नदीत तलावात म्हशी सोडल्यावर कारवाई सुरू झाली आहे .त्यामुळे एवढÎा म्हशी रोज धुवायचे कोठे हा प्रश्न गंभीर ठरला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी मंगळवार पेठ बेलबाग महालक्ष्मी नगर परिसरातील म्हैस पालन करणायांसाठी भविष्यातील कारवाई ओळखून “कॅटल सर्विस सेंटर दूध कट्टा व पार्लर” उभे केले आहे .म्हशींना पाणवठÎावर सोडण्यास निर्बंध आल्यामुळे त्यांनी उद घाटन वगैरे न करता हे बाथ सेंटर सुरू केले आहे. त्याला कॅटल सर्व्हिस सेंटर व पार्लर असे नाव दिले आहे. जवळच्या गंजीवाले खणीतले पाणी पंपाने उपसून या ठिकाणी आणले आहे .तेथे एका वेळी पाच सहा म्हशी उभ्या करता येतात. येथे म्हशींना भरपूर पाणी पिता येते. आणि मोटर सुरू केली की पाण्याची धार त्यांच्या अंगावर पडू लागते. फक्त म्हशींसाठी हा शॉवर होता पण म्हशी धुताना शॉवरखाली गवळीही भिजू लागल्याने त्याची रचना थोडी बदलली गेली आहे.
आज या भागातील जवळजवळ 190 म्हशींनी या शॉवर बाथचा मनसोक्त अनुभव घेतला. याबाबत मुळे पाणी वाया जात नाही हे जवळच्या बागेत वळवले गेले आहे. शेण साठवले गेले आहे. त्याचा खत म्हणून वापर केला जात आहे . म्हशीच्या अंगावरील केस काढल्यानंतर ते याच ठिकाणी साठवण्याची सोय करण्यात आली आहे. या म्हशींच्या शॉवर बाथ मुळे गवळी व्यवसायिकांची फार मोठी सोय झाली आहे .आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणवठÎाच्या ठिकाणी म्हशी सोडणे हे निदान या परिसरातल्या 196 म्हशीसाठी तर कायमचे बंद झाले आहे.अन्य भागात ही अशी सोय आवश्यक.
ठिकाणी गाई-म्हशी सोडल्याने पाण्याचे प्रदूषण होते हे खरे आहे. मग कोल्हापुरातल्या म्हैस पालन करणार्यांनी म्हशी कोठे धुवायच्या यासाठी ही सोय करण्यात आली आहे. पारंपारिक म्हशी पालनाचा व्यवसाय यामुळे जपला जाईल आणि पाण्याचे प्रदूषण ही थांबेल. शहराच्या इतर भागातील अशी सोय करता येईल. आमच्या मंगळवार पेठ ते पुरता तरी मी हा प्रश्न सोडवला आहे. विजय सूर्यवंशी.