प्रतिनिधी / असळज
असळज येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.असळज येथील भाऊ सखाराम पाटील यांच्या घराबाहेर असणाऱ्या कुत्र्यावर रात्री बिबट्या सदृश्य प्राण्याने झडप घातली.यावेळी नागरिकांना कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आल्याने त्यांनी बाहेर बटरी पडल्यावर त्यांना फक्त डोळे दिसले. बिबट्या गावात आल्याची बातमी पसरताच नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वनपाल बी. एल. कोळी वनपाल उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आर.एम.मुल्ला व वनकर्मचारी यांनी असळज येथे धाव घेऊन. सरपंच अनिता पळसंबेकर व पोलीस पाटील अरुण गावकर यांना नागरिकांनी दक्ष राहून काळजी घेण्याचे आवाहन केले.
याबाबत ग्रामपंचायतीने गावामध्ये दवंडी दिली. हिंस्र जंगली प्राणी गावात शिरल्याने नागरिकामध्ये घाबरट पसरून परिसराभोवती घरे असणाऱ्या नागरिकामध्ये संध्याकाळी सन्नाटा दिसून येत आहे.शेतीच्या कामाच्या सुगीमध्ये हा प्राणी गावात आल्याने लोकामध्ये शेतीच्या कामाबाबत अडचण निर्माण झाली आहे. मे महिन्यात अनिल पाटील यांच्या कुत्रा जखमी केला होता. त्याचबरोबर शेतीला राखणीला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले शेतकऱ्यांनी घाबरू नये.
बिबट्या सदृश्य प्राणी असळज येथे आल्याने नागरिकांनी भीतीने घाबरून जावू नये .जंगली प्राण्यांना डिवचू नये कारण ते अधिक हिंस्र होवू शकतात.याबाबत आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी काही अधिक माहिती किंवा प्राणी दिसल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क साधावा. -आर.एम.मुल्ला वनरक्षक असळज –खोकुर्ले ता.गगनबावडा