आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा व निदर्शने, शासकीय सेवेत सामावून घेण्यासह 15 मागण्यांसाठी रस्त्यावर
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासनाने आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांचे शोषण थांबवावे आणि त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जिल्हÎातील आशा स्वयंसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. आशांचा या एल्गार सुमारे दोन तास सुरू झाला. त्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. युनियनच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागणीचे निवेदन दिले.
कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हÎातील आशा वर्कर्सं व गटप्रवर्तक युनियनचा 15 जूनपासून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा सोमवारी सहावा दिवस. प्रलंबित मागण्यांसाठी आशांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल अद्यापी राज्य शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सोमवारी आशा स्वयंसेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला रेल्वे स्टेशन येथून सुरूवात झाली. दुपारी 12 वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे दोन तास निदर्शने करत शासन विरोधी घोषणा दिल्या. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे रस्ते ब्लॉक झाले.
जिल्हा आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळावा, आरोग्य सेवेत भरतीवेळी आशांना प्राधान्य द्यावे, यासह किमान वेतन मिळावे, कोरोना काळात प्रोत्साहन भत्ता 300 रूपये सर्व आशांना मिळावा, आशांना करारपत्र रद्द करून कायम नियुक्तीचे पत्र मिळावे, गटप्रर्वतकांना आशांप्रमाणे रेकॉर्डकिपींगसाठी 3 हजार रूपये मोबदला मिळावा, दैनिक भत्त्यामध्ये वाढ करावी, प्रसुती, वैद्यकीय रजा पगारी मिळाव्यात, 500 रूपये मोबाईल भत्ता मिळावा, महापुरात केलेल्या सर्वेक्षणाचे मानधन तातडीने मिळावे, महाआयुष सर्वेक्षणाचे मानधन द्यावे, कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या आशांना 10 लाखांची आर्थिक मदत मिळावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
आशा स्वयंसेविकांच्या या निदर्शनामध्ये युनियनच्या कॉ. चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, शहर अध्यक्षा ज्योती तावरे, यांच्यासह आशा, गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
न्यायदेवतेकडे आशांनी मागितला न्याय
निदर्शनावेळी आंधळÎा न्यायदेवतेच्या वेशात कोरोनात जीव धोक्यात घालून न्यायाची मागणी करणारी आशा उभी केली होती. तसेच कोरोना विषाणूचा नाश करणारी दुर्गारूपी आशा सहभागी झाली होती. या दोन्ही वेशभुषांनी लक्ष वेधून घेतले.