प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी म्युकर मायकोसीसचे 8 नवे रूग्ण दाखल झाले. पण म्युकरने मृत्यू झालेल्याची एकही नोंद दिवसभरात झालेली नाही. पण 39 जण म्युकरमुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सोमवारी म्युकरचे 6 नवे रूग्ण दाखल झाले. खासगी हॉस्पिटलमध्ये 2 रूग्ण दाखल झाले. म्युकरने दुसऱया दिवशीही मृत्यू झालेल्याची नोंद निरंक राहिली.
सध्या सीपीआरमध्ये 135 आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 62 रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यत म्युकरचे 206 रूग्ण झाले. त्यातील 30 जणाचा म्युकरने मृत्यू झाला. सध्या 137 रूग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी म्युकरमुक्त झालेल्या 39 जणांना डिसचार्ज दिल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.