प्रतिनिधी / कोल्हापूर
सन 2018/ 19 या गळीत हंगामात थकीत एफआरपीवरील व्याज वसुल करण्यात यावे अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी प्रादेशीक साखर सहसंचालक सदाशिवराव जाधव यांना देण्यात आले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी विभागीतील सर्व कारखान्यांकडून थकीत एफआरपीवरील व्याज वसुल करावे, असे आदेश दिले होते. दोन महिने झाले तरी प्रादेशीक साखर सहसंचालकांकडून काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी त्यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चूडमुंगे, विकास शेषवरे, सुरेश भोसले, दत्तात्रय जगदाळे, आप्पासो कदम आदी उपस्थित होते.