दिवसभरात 995 जण कोरोनामुक्त,
24 तासांत फक्त 109 पॉझिटिव्ह रूग्ण,
आयजीएममध्ये एकही कोरोना बळी नाही
पॉझिटिव्ह रूग्ण 109, कोरोनामुक्त 995, कोरोना 9 मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 9 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 995 जण कोरोनामुक्त आले तर 109 नवे रूग्ण दिसून आले. दिवसभरात 351 संशयित रूग्णांची तपासणी केली. त्यापैकी 195 जणांची अँटीजेन टेस्ट केली. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 46808 तर कोरोनामुक्तांची संख्या 40 हजार 771 झाली आहे. आयजीएम हॉस्पिटलमध्ये रविवारी कोरोना बळीची नेंद झालेली नाही.
जिल्ह्यात रविवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 351 जणांची तपासणी केली. सध्या 4 हजार 487 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 415 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 378 निगेटिव्ह तर 37 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 195 रिपोर्ट आले. त्यापैकी 18 पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 9 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये शित्तूर शाहूवाडी येथील 75 वर्षीय पुरूष, रंकाळा स्टँड कोल्हापूर येथील 95 वर्षीय महिला आणि मडिलगे भुदरगड येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटल्समध्ये कळंबा करवीर येथील 79 वर्षीय पुरूष, गुरूवार पेठ कोल्हापूर येथील 73 वर्षीय पुरूष, चिंचणी तासगाव सांगली येथील 78 वर्षीय पुरूष, नरसिंहपूर वाळवा सांगली येथील 64 वर्षीय पुरूष, जांभूळ शाहूवाडी येथील 68 वर्षीय पुरूष आणि निपाणी कर्नाटक येथील 10वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 550 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 751, नगरपालिका क्षेत्रात 329, महापालिका क्षेत्रात 346 तर अन्य 124 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 995 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 40 हजार 771 झाली आहे. आजरा 1, भुदरगड 5, चंदगड 3, गडहिंग्लज 6, गगनबावडा 1, हातकणंगले 7, कागल 1, करवीर 14, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 4, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 22, कोल्हापूर शहर 28 आणि अन्य 11 असे 109 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण 46 हजार 808
आजपर्यतचे कोरोनामुक्त झालेले रूग्ण 40 हजार 771
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण 4 हजार 487
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी 1550