– कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत ठराव
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा 7 लाखावरून 10 लाख करणेचा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.
संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटीच्या वर असुन ठेवीस 8 टक्के व्याज दर तर कर्जास 9 टक्के व्याज दर आकारला जातो. सदरच्या सभेस 130 सभासदानी लिंक द्वारे चर्चेत सहभाग घेतला. संस्थेचे सभासद संभाजी कदम, रामकृष्ण पाटील, प्रकाश माने, सुहास डोंगळे, अनिल पाटील, गिता मोरे यांनी प्रश्न विचारले. चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, सतिश मदने, पी. आर. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभा दीड तास खेळीमेळीत चालली. पी. आर. पाटील यांनी आभार मानले.
सभेस संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनिल घाटगे, शुभदा पाटील, छाया बेलेकर,राजेंद्र पाटील सरूडकर गणपाती कागनकर व्यवस्थापक संभाजी माळकर उपस्थित होते.