बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ड्रग तस्करी सुरूच आहे. एकीकडे ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर सीसीबी कारवाई करत असून दुसरीकडे मात्र खुलेआम ड्रग तस्करी सुरु आहे. सीसीबी पोलिसांनी ड्रग तस्करी प्रकरणात दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. व्यवसाय आणि पर्यटक व्हिसावर असलेले आणि शहरात अमली पदार्थ विक्री करणार्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोकेन, एक्स्टॅसी आणि एलएसडी असे अमली पदार्थ जप्त केले. त्यांच्याकडून ६५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नायजेरियातील इबोनी राज्य, ओबिओरा स्ट्रीट येथील रहिवासी उझोचुकवु मार्कमॉरिस मबटुएग्वू (वय ३०) आणि नायजेरियातील एनुगु राज्यात राहणारा जोसेफ नडुक्वे ओकाफोर (वय ३८) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी ड्रग्ज, मोबाइल फोन आणि काही रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी जोसेफ टूरिस्ट व्हिसावर देशात आला होता आणि येळाहंका येथील घरात राहत होता. त्याने व्हिसा नियमांचे उल्लंघन केले होते. तो त्याचा मित्र उष्मान मोहमद याच्याकडून औषधे विकत घ्यायची आणि शहरातील इतरांना ती विक्री करायचा.
पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. ६५ ग्रॅम कोकेन, ५०एक्स्टसी टॅब्लेट, ५६ एलएसडी पट्ट्या आणि १० ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल्स जप्त केले. त्याच्याकडून १५ लाख रुपये असून संपगेहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अआणखी एका घटनेतील आरोपी, उज्जोक्वू जो जक्कूर जवळ भाड्याच्या घरात राहत होता, त्याला विश्वासार्ह माहितीच्या आधारे सीसीबीने अटक केली. पोलिसांनी ५०० ग्रॅम एमडीएमए, ९१ एक्स्टसी टॅबलेट, ५६ एलएसडी पट्ट्या जप्त केल्या. त्याच्याकडून रोख रक्कम, तीन मोबाइल आणि एक कार जप्त केली.
पोलिसांनी सांगितले की, तो व्यवसाय व्हिसावर देशात आला होता आणि नियमांचे उल्लंघन करत अधिक पैसे मिळवण्यासाठी शहरात ड्रग विक्री करत होता. त्याच्याविरूद्ध अमृतहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.