प्रतिनिधी / जयसिंगपूर
येथील पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक गुंडाप्पा पवार यांची बिनविरोध निवड झाली. पालिकेमध्ये ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. नीता माने होत्या. निवडीनंतर यड्रावकर समर्थकांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
2 एप्रिल 2020मध्ये सुकृत नगरसेवक उदयसिंह खाडे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या सदस्य पदाची निवड करण्यात आली. या पदासाठी अनेकांनी आपलीच निवड व्हावी यासाठी राजकीय बळाचा वापर करून प्रयत्न केले मात्र, सध्या पालिकेमध्ये उपनगराध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडी व तारारानी आघाडीचे सदस्य एकत्रितपणे कार्य करीत असल्यामुळे शाहूनगरमधील यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक असलेले गुंडाप्पा पवार यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या युवा युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याने शाहूनगर परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.