अर्थ सभापती प्रवीण यादव यांनी अर्थसंकल्प केला सादर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन 2021-22 साठी 34 कोटी 84 लाख 32,831 रुपयांचे मुळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सन 2020-21 चा शिल्लक निधी 16 कोटी 70 लाख 29,425 रुपये व सन 2021-22 ची अपेक्षित जमा रक्कम 18 कोटी 19 लाख 51,500 रुपये असे एकूण 34 कोटी 89 लाख 80,925 लाख इतका होत असून, सन 2021-22 चा 5 लाख 48 हजार 94 रुपये शिल्लकीचा व 34 कोटी 84 लाख 32,831 रुपयेचा मुळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. जिल्हापरिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात अर्थ सभापती प्रवीण यादव यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थितीत होते.
सुधारीत अर्थसंकल्पाची ( 2020-21 ) काही वैशिष्ट्ये
बांधकाम विभागाकडील मुळ अपेक्षित जमा र.रु .90.28 लाखच्या तुलनेत रू . 15.00 लाखइतकी जमेत घट झाली आहे. कृषी विभागांतर्गत शेतक – यांसाठी विविध योजनांकरीता मुळ तरतूद रु .199.12 लाख मध्ये वाढ करुन .252.26 लाख करण्यात आली . दिव्यांगांसाठी विविध योजनांकरीता मुळ तरतूद 194.74 लाखामध्ये वाढ करुन 261.19 लाख करण्यात आली.
सन 2021-22 च्या मुळ अर्थसंकल्पातील विशेष योजना
शिक्षण विभाग– एकूण तरतूद- र.रु. 2,27,28,380 / • समग्र शिक्षण अभियाना व्यतिरिक्त इतर मुलांना गणवेश पुरविणे – र.रु. 16 लाख• प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी र.रु. 13 लाख • शिक्षण तज्ञ डॉ. जे. पी. नाईक समृध्द शाळा रु. 7 लाख • डॉ . जयंत नारळीकर विज्ञान जाणीव जागृती अभियान अंतर्गत र.रु. 13 लाख• जिल्हा परिषदेकडील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविणे र.रु .20.00 लाखतरतूद करण्यात आली.
बांधकाम विभाग- एकूण तरतूद – 3,63,54,200
रस्ते सुधारणा करणे र.रु. 1 कोटी • सैनिक टाकळी , शिवा काशिद , बाजीप्रभु देशपांडे , सरसेनापती प्रतापराव गुजर , स्वामीकार रणजीत देसाई , ग्रामीण विकासाचे शिल्पकार मा . यशवंतराव चव्हाण यांचे स्मारकाचा विकास व संरक्षण रु . 12 लाख. पाट बंधारे विभाग- एकूण तरतूद – 40 लाख/ • पाझर तलाव , गांव तलाव , कोल्हापूर पध्दतीचे बंधारे , दुरुस्ती व गाळ काढणे र.रु. 40 लक्षग्रामीण पाणी पुरवठा विभाग एकूण तरतूद – 2 कोटी 17 लाख( 20 टक्के राखीव देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 50 लाख) • डोंगर व दुर्गम भागातील नैसर्गिक झ – याभोवती संरक्षक कुंड बांधा न पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था करणे र.रु. 50 लाख• पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे र.रु. 7 लाखआरोग्य विभाग – एकूण तरतूद र.रु. 1 कोटी 1 लाख• जि.प. सदस्य भगवान पाटील यांनी समाजाचे मानसीक स्वास्थ्य संवर्धन करणे , आत्मबल विकास करणे यासाठीची एक विशेष नाविन्यपूर्ण योजना सुचविली असुन त्याचाही समावेश जिल्हयाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे • स्वच्छ सर्वांग दवाखाना ( नाविन्यपुर्ण योजना ) र.रु. 8 लाख• ग्राम आरोग्य संजिवनी / आशा संजिवनी कार्यक्रम र.रु. 20 लाख• दोन्ही वैद्यकिय अधिकारी नसलेल्या ठिकाणी मानधन तत्वावर बी.ए.एम.एस. वैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक करणे र.रु. 27 लाख
कृषी विभाग एकूण तरतूद 1 कोटी 19 लाख
50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशीन पुरविणे र.रु. 45 लाख• 50 टक्के अनुदानावर शेतक – यांना सुधारित अवजारे पुरविणे र.रु. 40 लाख• 50 टक्के अनुदानावर शेतक – यांना पी.व्ही.सी. / एच.डी.पी.ई . पाईप पुरविणे र.रु .15 लाख• बळीराजा पुरस्कार र.रु. 2 लाख पशुसंवर्धन विभाग एकूण तरतूद र.रु. 1 कोटी 26 लाखदुग्धवाढीसाठी उपाययोजना र.रु. 22 लाख• वंधत्व निवारण योजने अंतर्गत औषधे व क्षार मिश्रणे पुरविणे र.रु. 22 लाख75 टक्के अनुदानावर विधवा , परितक्त्या दारिद्र रेषेखालील महिलांना 2 शेळी / 20 तलंगा वाटप करणे र.रु. 10 लाखसमाजकल्याण विभाग एकूण तरतूद र.रु. 2 कोटी 36 लाख.
समाजकल्याण विभाग
डॉ . बाबासाहेब आंबेडकर व्यवसाय वृध्दी योजना – विदयार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षण ” ही नाविन्यपुर्ण योजना यावर्षी राबविणेचा मानस आहे . • राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करणे र.रु. । लाख• मागासवर्गीय महिलांसाठी माता रमाई वाहन चालन प्रशिक्षण र.रु. 14 लाख• डॉ . बाबासाहेब आंबेडकर व्यवसाय वृध्दी योजना र.रु. 12 लाख• मागासवर्गीय महिलांना स्वयंम रोजगारासाठी र.रु. 61 लाख कोरोना महामारीमुळे देशाच्या तसेच राज्याच्या एकंदरीत करसंकलना मध्ये घट झाली आहे . याचा परिणाम केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पावर झालेला आहे . स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थीक बाबतीत बऱ्यापैकी राज्यसरकारच्या अनुदानावर अवलंबुन असतात . परिणामी जिल्हा परिषदेला , राज्याकडून मिळणारे अनुदान यावर्षी पूर्णपणे प्राप्त झालेले नाही . सबब अर्थसंकल्पाच्या आकारमानात घट झाली आहे . जिल्हा परिषदेकडील सन 2021-22 चा रक्कम रुपये 5,48,094 / – शिलकीचा व रक्कम रुपये 34,84,32,831 / – चा मुळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला.सभागृहाने त्यास मंजुरी दिली.