ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय बाजारात आज सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. आज सोने प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांनी घसरले. तर एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.24 टक्क्यांनी घसरून 44,795 वर, तर चांदी 0.5% खाली घसरून 66,013 प्रती किलो झाली.
दिल्ली सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 43,800 आहेत. सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 302 रुपयांची घट झाली होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोने किंचित वाढून 1.731 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 1533 रुपयांनी घसरून 65,319 रुपये प्रति किलो झाली.