प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 15 जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 594 नवे रूग्ण दिसून आले. सक्रीय रूग्णसंख्या 3 हजार 880 वर गेली आहे. दिवसभरात 152 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, सलग तीन दिवस कोरोना बळींनी दुहेरी आकडÎाची हॅटट्रीक केली आहे..
जिल्ह्यात रविवारी गेल्या 24 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुक्ते, रत्नागिरी येथील प्रत्येकी एक वगळता अन्य सर्व जिल्ह्यातील आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शहरातील शिवाजी चौक येथील 58 वर्षीय पुरूष आणि मंगळवार पेठेतील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील 50 वर्षीय पुरूष, शाहूवाडी तालुक्यातील कोंडे येथील 60 वर्षीय महिला, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील 80 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील भामटे येथील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील 55 वर्षीय महिला, कोरोची शिवाजीनगर येथील 64 वर्षीय महिला, आणि रूकडी येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात गडहिंग्लज तालुक्यातील डुगुणवाडी येथील 82 वर्षीय पुरूष, आणि महागाव येथील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्ह्यातील मलठण (ता. शिरूर) येथील 44 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील 48 वर्षीय पुरूष, भुदरगड तालुक्यातील बरवे येथील 27 वर्षीय पुरूष आणि पन्हाळा तालुक्यातील वारनुळ येथील 70 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
दिवसभरातील या 15 बळींमुळे आजपर्यत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 883 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 914, नगरपालिका क्षेत्रात 358, शहरात 423 तर अन्य 188 जण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
दरम्यान, गेल्या 24 तासांत 1 हजार 912 जणांची तपासणी केली. त्यातील 508 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. जिल्ह्Îातील सक्रीय रूग्णसंख्या 3 हजार 880 वर पोहोचली आहे. तसेच 152 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 51 हजार 557 झाली आहे. गेल्या 24 तासांत 594 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 19, भुदरगड 32, चंदगड 12, गडहिंग्लज 16, गगनबावडा 2, हातकणंगले 50, कागल 11, करवीर 70, पन्हाळा 25, राधानगरी 12, शाहूवाडी 18, शिरोळ 21, नगरपालिका क्षेत्रात 14 कोल्हापुरात 228 तर अन्य 64 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 57 हजार 320 झाली आहे. शहरात 620 तर ग्रामीण भागात 1 हजार 258 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
क्वारंटाईन
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 405 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 984 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 125 अहवाल आले. त्यातील 59 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 506 रिपोर्ट आले. त्यातील 355 निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्यात 105 केंद्रांवर 9 हजार जणांना लस
जिल्ह्यात 105 केंद्रांवर रविवारी 9 हजार 200 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आजपर्यत 6 लाख 32 हजार 650 जणांनी लस घेतल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील 230 पैकी 105 केंद्रांवर लस घेण्यासाठी रविवारी गर्दी झाली. दरम्यान, रविवारी 127 आरोग्य सेवकांनी पहिला तर 115 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यत 38 हजार 824 हेल्थवर्कर्सनी लस घेतली आहे. रविवारी 530 पंटलाईन वर्कर्सनी पहिला तर 239 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यत 40 हजार 623 जणांनी पहिला तर 12 हजार 420 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 45 ते 59 वयोगटातील 7 हजार 253 जणांनी पहिला तर 577 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आजपर्यत 2 लाख 69 हजार 943 जणांनी लस घेतली आहे. 60 वर्षांवरील 3 हजार 470 ज्येष्ठ नागरिकांनी रविवारी पहिला तर 1 हजार 263 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यत 6 लाख 83 हजार 447 ज्येष्ठांनी लस घेतली असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली.
कोरोना रूग्ण 594 ः एकूण ः 57320
कोरोनामुक्त 152 ः एकूण ः 51557
कोरोना मृत्यू 15 ः एकूण मृत्यू ः 1883
सक्रीय रूग्ण ः 3880