प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यात 151 रुग्णांची भर पडली. शहरात आज 64 नवे रुग्ण आढळले. तर पन्हाळा तालुक्यात 3, करवीर 38, भुदरगड 1, कागल 6, हातकणंगले 33, गगनबावडा 3, शिरूर 3, आजरा 2, चंदगड 1, गडहिग्लज 1 आणि इतर 7 रुग्णांची वाढ झाली.
आज जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत 77 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले होते. यामध्ये शहरातील 26 जणांचा समावेश आहे.