मंत्री हसन मुश्रीफ यांना संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी / कागल
ग्रामपंचायत प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नेमणूक करावी. तसेच थकीत मानधन व प्रवासी भत्ता लवकर मिळवा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्यावतीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पोलीस पाटील हे पद शासन यंत्रणेतील गाव पातळीवरचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. इतिहास काळापासून चालत आलेली ही पाटीलकी ग्राम पोलीस अधिनियम 1867 सालापासून पोलीस पाटील म्हणून ओळखली जाऊ लागली. 1967 साला पर्यंत वारसा हक्काने चाललेली ही व्यवस्था त्यानंतर घटनेतील तरतुदीनुसार सर्व जाती-धर्माना समाविष्ट करुन कार्यरत आहे. सध्या कोव्हिड -19 रोगाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीमध्ये गावपातळीवर पोलीस पाटील यांनी प्रामाणिकपणे, चांगल्या रीतीने कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नेमणूक करावी. तसेच थकीत मानधन व प्रवासी भत्ता लवकर मिळवा, या मागण्या पूर्ण कराव्यात.
यावेळी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मारुती मानकू पाटील, कागल विभाग आप्पासाहेब पोवार, कागल तालुकाकार्य अध्यक्ष भरत कुंभार, सुहास कुंभार, उदय पोतदार, संजय बल्लाळ, महादेव कुंभार, सुनिल कुंभार, वंदना सुतार, सविता शिंदे, शुंभागी गोरडे, सविता शिंदे, हातकणंगले अध्यक्ष रियाज मुजावर, नितीन तराळ, राहुल वाघमोडे, गडहिंग्लज विभाग आनंदराव गवळी, उदय पुजारी, सागर कांबळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.