कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेत जिल्हÎात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. लसीकरण प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. लसीचा तुटवडा असला तरी पुरवठयानुसार नागरिकांना लस देण्यात येत आहे. संकटाच्या या काळात कोल्हापूर जिल्हÎाने लसीकरणात दहा लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये प्रंट लाईन वर्कर, नागरिकांनी पुढाकार घेतल्याने हा टप्पा पार झाला आहे.
लसीकरणाच्या या महत्वपूर्ण टप्प्यात लसीचा पहिला डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 8 लाख 71 हजार 270 इतकी आहे. तर 1 लाख 44 हजार 635 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दहा लाखांचा टप्पा पार केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन राबणाऱया प्रंटलाईन वर्कर, कोरोना योद्धे यांच्यासह लस घेतलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर शासनाच्या वयोगटाच्या निर्देशानुसार सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
लसीकरणावर दृष्टीक्षेप (लस घेतलेल्यांची संख्या)
पहिला डोस घेणारे ः 8 लाख 71 हजार 270
दुसरा डोस घेणारे ः 1 लाख 44 हजार 635
…………………………………………………………………..
60 वर्षांवरील ः 3 लाख 84 हजार 925
45 वर्षांवरील ः 4 लाख 11 हजार 286
18 ते 45 वयोगट ः 75 हजार 25
……………………………………………………………………………………
लसींच्या कमतरतेच्या काळात कोल्हापूर जिल्हÎाची लसीकरणाची कामगिरी कौतुकास्पद आहे. जिह्यातील नागरिकांचे 100 लसीकरण लवकरत लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला खात्री आहे, आपण सर्व कोल्हापूरकर मिळून एकदिलाने कोरोनाची ही लढाई नक्की जिंकू.
-सतेज पाटील, पालकमंत्री