प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 48 नवे रुग्ण आढळून आले तर सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णंसख्या 560 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आजरा, भूदरगड, चंदगड, गगनबावडा, कागल, राधानगरी आदी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर गडहिंग्लज 4, हातकणंगले 3, करवीर 4, पन्हाळा 1, शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 3 नवे रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहरात 25 रुग्ण मिळून आले. आरटीपीसीआर चाचणीच्या 312 अहवालातून 6 जणांचे, अँटीजेनच्या 468 अहवालामधून 9 आणि खाजगी लॅबच्या 3 हजार 294 अहवालापैकी 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले.