3 मृत्यू, 73 नवे रूग्ण, 116 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 73 नवे रूग्ण आढळले तर 116 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 971 झाली आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांनंतर सक्रीय रूग्णसंख्या 1 हजारांच्या खाली आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दऱयाचे वडगाव, चाकाक आणि परजिल्ह्यातील परभणी येथील एकाचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5,738 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3070, नगरपालिका क्षेत्रात 823, शहरात 1247 तर अन्य 598 आहेत. दिवसभरात 116 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 98 हजार 707 झाली आहे. गेल्या 24 तासांत 73 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, हातकणंगले 11, कागल 1, करवीर 8, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 7, नगरपालिका क्षेत्रात 11, कोल्हापुरात 21 तर परजिल्ह्Îातील चौघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 416 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 15 आणि ग्रामीण भागात 214 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण : 73 एकूण : 2,05,416
कोरोनामुक्त : 116 एकूण : 1,98,707
कोरोना मृत्यू : 3 एकूण मृत्यू : 5738
सक्रीय रूग्ण : 971