एकूण रूग्णसंख्या 52 हजारांवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81 नवे रूग्ण मिळून आले. तर 80 जण केरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 773 झाली आहे. कोरोना रूग्ण संख्या 52 हजार 60 झाली आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 515 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची नोंद निरंक राहिली त्यामुळे कोरोना मृत्यू संख्या 1,772 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 862, नगरपालिका क्षेत्रात 351, कोल्हापूर शहरात 393 तर अन्य 166 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 80 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 515 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 8, गगनबावडा 1, हातकणंगले 9, कागल 3, करवीर 8, पन्हाळा 3, राधानगरी 1, शाहूवाडी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहरात 25 तर अन्य 14 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1436 जणांची तपासणी केली. त्यातील 153 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 773 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 1054 अहवालापैकी 1003 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 112 अहवाल आले. त्यातील 107 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 413 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 52 हजार 60 आहेत. त्यापैकी 49 हजार 515 कोरोनामुक्त झाले. आजअखेर 773 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 339 तर ग्रामीण भागात 126 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 81 : एकूण : 52060
कोरोनामुक्त 80 : एकूण : 49515
कोरोना मृत्यू : 0 : एकूण मृत्यू : 1772
सक्रीय रूग्ण : 773