प्रतिनिधी / कोल्हापूर
मार्च महिना म्हणजे व्यापारी, उद्योजक व बँकांची मार्च एडींगसाठी महिनाभर धावपळ सुरू होती. या महिन्यातच शासकीय देणे-घेणे, नफा-तोटा काढणे, तसेच सरकारी कर भरण्यासाठी बुधवारचा दिवस धावपळीत होता. 31 मार्चला शहरातील मुद्रांक शुल्क, बँक, शासकीय कार्यालये, महापालिका, आयकर कार्यालयांचे कामकाज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे याबाबतची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
नवीन फ्लॅट, जागा खरेदी करणाऱयांसाठी 31 मार्चअखेर स्टॅम्प डÎुटी, अर्थात मुद्रांन शुल्कामध्ये 1 टक्का सवलत होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये गर्दी होती. 31 मार्चपर्यंत ही नोंदणी करणाऱयाला चार टक्के स्टॅम्प डयुटी भरावी लागणार आहे. 1 एप्रिलनंतर ही डÎुटी 5 टक्के होणार असल्याने, ही 1 टक्का सूट मिळवण्यासाठी बुधवारी मुद्रांक शुल्क कार्यालयात सोशल डिस्टींगशन न पाळता गर्दी दिसून आली. स्टॅम्प डÎुटीच्या सवलतीसाठी डाटा एन्ट्रीची नोंदणी केल्यास, चार महिन्यांपर्यंत खरेदीची नोंदणी करता येणार आहे. बुधवारी बहुतांशी इच्छुकांची नोंदणी झाल्याचे समजते.
बुधवारी सर्व बँकाचे कामकाज सुरू होते. गुरुवारी मात्र बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. बँकांचे अंतर्गत काम सुरू राहणार आहे. बँकांमध्ये देवाणघेवाणीच्या व्यवहाराचे काम सुरू होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता बँकांचे कामकाज ऑनलाईन सुरू होते. शहरातील सुमारे 248 विविध शासकीय कार्यालयांकडून येणारी चलने रात्री उशिरापर्यंत देण्याचे काम सुरू होते. पूर्वी विविध खात्याकडून चलने येत होती, पण ऑनलाईन सुविधा असल्याने मार्च क्लोजिंग सोयीचे झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोषागर कार्यालयाला भेट दिली.
31 मार्चअखेर बांधकाम फ्लॅटंच्या खरेदी-विक्रीसाठी स्टॅम्प डÎुटीमध्ये 1 टक्का सुट असल्याने मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये गर्दी होती. 31 मार्चपर्यंत डाटा एन्ट्री स्टॅम्प डÎुटीची नोंदणी केल्यास चार महिन्यापर्यंत खरेदीची नोंदणी करता येणार असल्याने इच्छुकांची बुधवारी मोठी गर्दी झाली होती.