प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 जणांचा मृत्य़ू झाला. दिवसभरात 1 हजार 999 अर्थात दोन हजार नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 799 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 506 झाली आहे. कोरोना मृत्यू जरी कमी झाले असले तरी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण अन् सक्रीय रूग्णांत वाढ झाली आहे.
जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 86 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 740, नगरपालिका क्षेत्रात 725, शहरात 1 हजार 73 तर अन्य 548 आहेत. दिवसभरात 1 हजार 799 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 59 हजार 593 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 999 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 107, भुदरगड 51, चंदगड 27, गडहिंग्लज 82, गगनबावडा 20, हातकणंगले 250, कागल 121, करवीर 435, पन्हाळा 116, राधानगरी 56, शाहूवाडी 66, शिरोळ 176, नगरपालिका क्षेत्रात 148, कोल्हापुरात 318 तर अन्य 26 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 78 हजार 185 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 20 हजार 33 अहवाल आले. त्यापैकी 18 हजार 28 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 334 अहवाल आले. त्यातील 3 हजार 112 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 3 हजार 75 अहवाल आले. त्यातील 2 हजार 865 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 13 हजार 614 रिपोर्ट आले. त्यातील 12 हजार 51 निगेटिव्ह आहेत.
परजिल्हय़ातील एकाचा कोरोनाने मृत्य़ू
परजिल्हय़ातील रायगड येथील एकाचा तर तर शहरातील 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये जवाहरनगर, कदमवाडी, साने गुरूजी वसाहत, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ, लक्षतीर्थ वसाहत आणि राजारामपुरी येथील व्यक्तींचा समावेश आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 318 1681 1999
आजपर्यतचे बाधीत 48411 1,29,374 1,78,185
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1799 1,59,593
दिवसभरातील मृत्यू 12 13 25
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1073 4013 5086
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 226 3112 3344
अँटीजेन 210 2865 3075
ट्रुनेट 13614 18028 1563
…………………
सक्रीय रूग्ण 13,506
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 89.56 टक्के
एकूण चाचण्या : सोमवार : 20033 एकूण 13,08,551
मृतांची संख्या : 25 जिल्हा : 24 बाहेरील : 1
दीर्घकालीन व्याधी 4 0
60 वर्षावरील 16 0
पहिल्या 48 तासांत मृत्यू 10 0
आजअखेर मृत संख्या 5086 जिल्हा : 4538 अन्य : 548