पुलाची शिरोली / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत सन २०२० चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले . यामध्ये चंदगड तालुका – लक्ष्मण व्हन्याळकर ( दै. तरुण भारत) करवीर तालुका – सतीश पाटील ( दै. तरुण भारत ) हातकणंगले तालुका संतोष सणगर ( दै. तरुण भारत) कागल तालुका – सागर लोहार (दै. तरुण भारत ) यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी १० जानेवारी रोजी घोडावत उद्योग समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीस अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, अॅड. प्रशांत पाटील, प्रा.भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रा.रवींद्र पाटील ,अतुल मंडपे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, विवेक स्वामी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.