प्रतिनिधी / इचलकरंजी
वस्त्रोद्योगातील तंत्रशिक्षणाबरोबरच विविध विभागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्थात डिकेटीई देशातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून गणले जात आहे. डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील तीन विद्यार्थ्यांची परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. डीकेटीईचे २३ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार आहेत. येथील विद्यार्थ्यासाठी या करारामुळे लॉकडाउनच्या काळात देखील जगभर शिक्षणाची सर्व दालने खुली झाली आहेत यामुळे परदेशात आंतराराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होत आहे.
यापूर्वी डीकेटीईने केलेली शैक्षणिक क्षेत्रात प्रगती अतुलनिय व आदर्शवत आहे यामुळे येथील विद्यार्थ्यांनी टोफेल जीआरई व आईएलटीएस ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे व त्या आधारे त्याची जर्मनी, स्वीडन व अमेरिका विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
समर्थ गायकवाड याची एम.एस. इंडस्ट्रीयल इंजिनिअरींग साठी टेक्सास टेक युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे निवड झालेली आहे त्याला १३ लाख रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळालेली आहे. सौरभ गुमताज याची मास्टर्स प्रोग्रॅम इन रोबोटीक्स साठी युनिव्हर्सिटी वेस्ट, स्वीडन येथे निवड झालेली आहे त्याला टयुशन फी मध्ये शैक्षणिक सवलत मिळालेली आहे. तन्मय कुरकुटे याची एम.एस.सी. टेक्स्टाईल इंजिनिअरींग साठी आर. डब्ल्यू.टी.एच. आकेन युनिव्हर्सिटी, जर्मनी येथे निवड झालेली आहे.
या परिक्षेत यश मिळविण्यासाठी डीकेटीईमध्ये करिअर गायडन्स सेल मार्फत जर्मन लँगवेज क्लासेस, विविध तज्ञांचे लेक्चरचे वेळोवळी आयोजन करण्यात आले होते. या लेक्चरमुळे विद्यार्थ्यांना आंतराराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिध्द करण्यासाठी प्रेरणा मिळते. परदेशात उच्च शिक्षणासाठी डीकेटीईने निर्माण केलेल्या संधीमुळे टेक्स्टाईल व इंजिनिअरींग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटला आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर व्ही केतकर, सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांस डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.डॉ. व्ही.आर. नाईक, प्रा. बी.बी कबनुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डीकेटीईतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सर्व कुटुंबियांचे सहकार्य यामुळेच आम्ही हे यश प्राप्त करु शकलो अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.